ज्येष्ठ पत्रकार संजय दिनकर यांना भावपूर्ण आदरांजली
पुण्यातील ज्येष्ठ पत्रकार संजय दिनकर कुळकर्णी यांचे निधन.
'संजय दिनकर' या नावानेच ते परिचित होते. फिल्मी लिखाण हा त्यांचा आवडीचा प्रांत होता. त्यांची पाच फिल्मी पुस्तकेही प्रसिध्द झाली आहेत. जयवंतराव टिळक यांच्या काळात त्यांनी "केसरी"त पत्रकारिता सुरू केली व आयुष्यभर केसरीवाड्यातच प्रामाणिक सेवा केली. "सांज केसरी" सुरू झाला तेव्हा ते त्याचे संपादक होते.
1996च्या याच काळात नाशिक सकाळ सोडून मी पुण्यात 'रानडे'ला एमसीजे करण्यासाठी आलो होतो. तेव्हा संजय दिनकर यांनी मला व माझा 'बीसीजे'तला सहकारी संजय श्रीधर आवटे याला "सांज केसरी"त पार्ट टाइम नोकरी दिली होती. नारायण पेठेतील ते मंतरलेले दिवस होते. पुणे विद्यापीठाच्या होस्टेलमधून माझ्या 'सनी'वर मी व संजय सकाळी 6 लाच निघून केसरीवाड्यात पोहोचायचो. तिथे नाक्यावरील अमृततुल्यमध्ये संजय दिनकर आमची वाट पाहात थांबलेले असायचे. सोबत चहा घेऊन आमचे काम सुरू व्हायचे. काम आटोपल्यावर पुन्हा असे दोन्ही चहा त्यांचेच! 6.30 ते 10.30 अशी ती ड्युटी असायची व 11 वाजता कॉलेज!
संजय दिनकर हा जबरदस्त न्यूज सेन्स असलेला माणूस, अतिशय चटपटीत व कॅची हेडिंग द्यायचा. कॉपी एकदम क्रीस्प, चुरचुरीत व आटोपशीर, पाल्हाळाला थारा नाही. लिखाणाच्या हातात थोडे अपंगत्व असले तरी त्यांची लेखणी निरंतर प्रभावी राहिली. काही दिवसांपूर्वी त्यांची पत्नी गेली तेव्हा मी त्यांना पुण्यात भेटलो होतो, तेव्हा ते थकलेले दिसत होते. एकुलत्या एक मुलाच्या दहावीच्या काळजीत होते.
संजय दिनकर ज्येष्ठ पत्रकार म्हणून गेले, पुण्यात सर्वांना परिचित असले तरी फार काही मोठे नाव कमावता नाही आले. अशी चांगली माणसे मोठी का होऊ दिली जात नाहीत, हे मला नेहमी सतावणारे कोडे आहे. संजय दिनकर या माणसाला तडजोडी जमल्या नाहीत, लांगुलचालन, हुजरेगिरी कधी जमली नाही; त्यामुळे बदलत्या काळाच्या मानसिकतेत आणि व्यवस्थापनात ते काहीसे मागे पडले. मात्र कसलाही इगो नसलेला, माझ्यासारख्या ज्युनिअरला सांभाळून घेणारा हा शतप्रतिशत निर्मळ, शुध्द, प्रामाणिक आणि चारित्र्यवान माणूस होता.
भुसावळला नातेवाइकाकडे यायचे आणि माझ्याकडे मुक्कामी राहायचे, ते गेले कित्येक दिवस म्हणत होते; पण तो योग आलाच नाही.
संजय दिनकर यांना माझी भावपूर्ण अदरांजली!
इश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
पत्रकारितेतील एक सच्चा माणूस गेला; माझ्यादृष्टीने एक फार मोठा, इमानदार माणूस गेला!

No comments:
Post a Comment
Your comment is submitted! Thanks for your Feedback.