Monday, 24 March 2014

'प्रिंट' जाहिरातविश्वाने टाकली कात!

बटन दाबा; पेपरवरचे मोटोरोला मोबाईल फोनचे मॉडेल बदलेल रंग

कोण म्हणतोय की जाहिरातदारांचा प्रिंट मीडियाकडील ओढा कमी होतोय म्हणून? वृतपत्रे संपणार नाहीत पण लोकप्रियता टिकवून ठेवण्यासाठी त्याना नवे फंडे अजमावेवे लागतील. मी तुम्हाला सांगतोय तो भन्नाट जाहिरातीचा प्रयोग केलाय अमेरिकेतील 'वायर्ड' या मासिकाने. या मासिकाचा न्यू यॉर्क आणि शिकागो या शहरातीलच खप आहे तब्बल दीड लाख! मोबाईल्स, टेक्नोलॉजी याची माहिती यात असते. तरुणांमध्ये लोकप्रिय अशा याच मासिकात 'मोटोरोला'ला त्यांच्या 'मोटो एक्स'ची जाहिरात करायची होती; पण काहीतरी भन्नाट, हटके असे हवे होते.

गेल्या काही वर्षात भारतासह जगभरात कुठेही प्रिंट माध्यमात अफलातून, नाव घेण्याजोगा प्रयोग झाला नव्हता. फार-फार तर काय तर गेट फोल्डची वेगवेगळी डिझाईन्स, जॅकेट-हाफ जॅकेट, वेगवेगळ्या सुवासिक वासाची फवारणी, वेगळ्या रंगाचा कागद, स्पेशल पोजिशन, एम्बॉस, सुपरइम्पोज या पलीकडे नवे काही घडत नव्हते. 'मोटोरोला'ला 'मोटो एक्स' हे मॉडेल न्यू यॉर्क आणि शिकागो या दोन शहरातच जबरदस्त लॉंच करायचे होते. त्यासाठी 'वायर्ड'ने जी काही धमाल केली त्यामुळे हे कॅम्पेन सुपर-डुपर हिट ठरले. 'गुगल'च्या मालकीच्या 'मोटोरोला'ने या जाहिरात मोहिमेनंतर या दोन शहरातच पाच लाख  'मोटो एक्स' मोबाईल्स विकले.

नेमके काय होते या जाहिरातीत?
ही जगातील पहिली प्रिंट इंटरएक्टीव्ह जाहिरात ठरली. त्यासाठी पॉलीकार्बोनेटचे खास कागद वापरले गेले. त्यात पातळ फ्लेक्सीग्लास व चार लाइटसचे एलईडी सर्किट्स फीट केले होते (सर्किट दोन पेजेसच्या मध्ये जाहिरातीखाली दडवल्याने वरुन दिसत नाही) जाहिरातीत मोबाईल फोनखालील ज्या रंगाचे बटन वाचक दाबातील त्यानुसार, फोनचे मॉडेल रंग बदलते. आहे की नाही डोक्यालीटी! 'मोटोरोला'चा ग्लोबल मार्केटिंग डायरेक्टर बॅरी स्मिथ याच्या डोक्यातून निघालेली ही कल्पना! यापूर्वी इस्क्वायर या मासिकाने 2008 मध्ये ई-इंक कव्हरचा लक्ष्यवेधी प्रयोग केला होता.

इथे पाहा या भन्नाट 'अयडिया'च्या कल्पनेचा व्हिडीओ -

 

No comments:

Post a Comment

Your comment is submitted! Thanks for your Feedback.