टेम्पल रन
सगळ्यात जास्त व्यसन लावणारा किंवा जगभरातील स्मार्टफोनधारक सर्वात जास्त खेळतात असा हा खेळ. तुम्ही म्हणजेच खेळातल पात्र एका पुरातन मंदिरातून एक महत्वाची जुनी मूर्ती चोरून मंदिराबाहेर पडता आणि भयंकर माकडरुपी राक्षस तुमच्या मागे लागतात आणि सुरु होतो ‘टेम्पल रन’….
कधीही न संपणारा असा हा खेळ आहे.वाटेत येणाऱ्या अडथळ्यांपासून वाचून तुम्हाला सतत धावत रहायचं आहे.कुठे जरा अडकलात कि मागचे राक्षस तुम्हाला पकडून तुमचा लागलीच फडशा पाडतात.ह्यात खेळ संपल्यावर ज्या कारणाने खेळ संपतो त्या कारणाला अनुसुरून मनोरंजक वाक्य लिहून येतात जी वाचायला खरोखर मजा येते.ह्यात उजव्या आणि डाव्या बाजूला वळण्यासाठी त्या दिशेला बोट स्क्रिन वर फिरवा.तसच उडी मारण्यासाठी पुढच्या बाजूला तर खाली झोपून जाण्यासाठी खालच्या बाजूला बोट फिरवाव लागत.आजूबाजूला जाण्यासाठी फोन त्या दिशेला (टील्ट करा) फिरवा. आणि अस धावत असतांना वेगवेगळी छोटी छोटी ध्येय आपल्याला पूर्ण करायची असतात तसेच रस्त्यात मिळणारी पिवळ्या रंगाची नाणीही आपण गोळा करायची कारण त्यांच्याद्वारे आपल्याला पुढे वेगवेगळ्या शक्ती प्राप्त करून घेता येतात.पुढे ह्या नाण्यांचा रंग त्यांच्या किमतीप्रमाणे वाढून लाल ,निळा असा होतो. ह्या नाण्यांबरोबरच रस्त्यात तुम्हाला इतरही शक्ती मिळतात.ह्यात अदृश्य होण्याची शक्ती ,नाण्यांच चुंबक ,अतिजलद धाव ,नाण्यांची संख्या व किंमत वाढवायची शक्ती अश्या शक्ती आहेत.आपण मिळवलेल्या नाण्यांद्वारे आपण ह्या शक्ती जास्त काळासाठी आपल्याकडे ठेऊ शकतो. तसेच नाण्यांनी आपण खेळात इतर पात्र सक्रिय करू शकतो तसेच पडण्यापासून जीवदान देणारे पंख सक्रिय करू शकतो.म्हणजेच एकूण अडथळ्यांपासून वाचत धावत जातांना नाणी गोळा करणही तितकच महत्वाच आहे. आणि जस जस तुम्ही पुढे पुढे जाता अडथळ्यांच प्रमाण आणि तीव्रता तसेच तुमचा वेग वाढत जातो. तर बघा तुम्हाला किती धावता येते ते…..
हा खेळ गुगल प्ले वरून इथून डाउनलोड करा. फेसबुकवर ‘टेम्पल रन’ला सुमारे ७५ लाखाहून अधिक जणांनी पसंती दर्शवलेली आहे. तर ‘टेम्पल रन -२’ ह्या त्यांच्या नंतर आलेल्या नव्या खेळाने पहिल्या १३ दिवसात५०० लाखाहून अधिक वेळा डाऊनलोड होऊन मोबाईल गेमिंगमध्ये एक वेगळाच उच्चांक गाठला आहे. टेम्पल रन-२ च ग्राफिक्स अतिशय सुंदर आहे.
टेम्पल रनच्या यशामुळे त्याच्याशी साधर्म्य असणारे अनेक खेळ आपल्याला प्लेस्टोर वर आढळतात.त्यापैकी खेळायचाच असेल तर सबवे सर्फर आणि एजंट डॅश हे खेळ तुम्ही ट्राय करु शकता.
No comments:
Post a Comment
Your comment is submitted! Thanks for your Feedback.